मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
मुंबई, दि. ८
देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या वेळेत विद्याविहार ते ठाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेगाब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या / येणाऱ्या डाऊन आणि अप मेल, एक्स्प्रेस, ठाणे ते विद्याविहारदरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल, बेलापूर, वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी, नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
—–