* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> कोकण रेल्वेवर उद्या आणि गुरुवारी मेगाब्लॉक; काही गाड्यांच्या वेळेत बदल – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
वाहतूक दळणवळण

कोकण रेल्वेवर उद्या आणि गुरुवारी मेगाब्लॉक; काही गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई, दि. ९
कोकण रेल्वेवरील कडवाई ते रत्नागिरी स्थानकांदरम्यान उद्या (१० ऑक्टोबर) सकाळी ७.४० ते सकाळी १०.४० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ९ ऑक्टोबर रोजी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनवेल ते जामनगर रेल्वेगाडी ठोकूर ते रत्नागिरीदरम्यान तीन तास थांबविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक नेत्रावती एक्स्प्रेस ठोकूर ते रत्नागिरीदरम्यान दीडतास थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक १२०५१ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस खेड ते चिपळूणदरम्यान २० मिनिटे थांबविण्यात येणार आहे.

१२ ऑक्टोबर रोजी मडगाव ते कुमठा दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक ०६६०२ मंगळुरू सेंट्रल ते मडगाव गाडी मंगळुरू ते कुमठा दरम्यान धावणार आहे. तर कुमठा ते मडगावदरम्यान ही गाडी रद्द करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०६६०१ ही मडगाव ते मंगळूरदरम्यान विशेष गाडी कुमठा ते मंगळुरू धावणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *