ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई दि.२७ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (रविवारी) ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी ११ .१० ते दुपारी ४.१० या कालावधीत हा मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी ठाणे ते वाशी-नेरुळ-पनवेल दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी मुख्य आणि हार्बर मार्गाने प्रवास करू शकतील.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.