ठाणे : विद्युत ठेकेदार अनुज्ञाप्ती(लायसन्स) मिळण्याच्या दृष्टीने पात्र अभियंत्यांचा मेळावा
( म विजय )
विद्युत विभागाशी संबंधित कामाचे ठेके पात्र अभियंत्यांना उपलब्ध होऊन त्यांना रोजगार उपलब्ध व्हावे याकरता आवश्यक अनुज्ञाप्ती (लायसन्स) व इतर प्रक्रिया समजून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या अखत्यारीतील विद्युत निरीक्षण विभाग व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या म्हणजेच अभियांत्रिकी पदवी/पदविका व त्यानंतर किमान एक वर्ष अनुभव असणाऱ्या अभियंत्यांना या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घेता येईल. उपस्थित अभियंत्यांना विद्युत निरीक्षक श्री. नंदकिशोर बेहरम हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Please follow and like us: