रामदास आठवले आणि छगन भुजबळ यांची भेट
मुंबई दि. ८
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आठवले यांनी भुजबळ यांचे अभिनंदन केले. भाजप, शिवसेना, आरपीआय यांच्या महायुतीत भुजबळ सहभागी झाल्याबद्दल आठवले यांनी भुजबळ यांचे स्वागत केले. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे यावेळी उपस्थित होते.
—–