महाराष्ट्रात पुढील वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीत – वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन

मुंबई दि.२९ :- पुढील वर्षापासून महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी भाषेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे, अची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

एमबीबीएस किंवा मेडिकल यासारख्या शाखांचं शिक्षण इंग्रजी भाषेतूनच दिलं जाणार आहे, मात्र, विद्यार्थांना विषय समजून घेता यावा, यासाठी संबंधित विषयांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद केला जाणार असल्याचेही महाजन म्हणाले.

मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून उपलब्ध करून देणे, ही मध्यप्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हे हिंदीतून वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवणारं देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.