वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयावर मोर्चा

कामगार उपायुक्तांसमवेत विविध मुद्द्यांवर चर्चा

मुंबई आसपास प्रतिनिधी

मुंबई, दि, २३ वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर येत्या २१ डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा येईल, असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ) दिला आहे.

काशी कॉरिडॉर प्रमाणे पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा

कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत (औरंगाबाद) यांना संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नुकतेच एक निवेदन सादर केले.‌ त्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे.

डेन्मार्क राज्यात दुग्ध उत्पादनातील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार

कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, कामगारांच्या वेतनामधून विविध नावाने कामगारांकडून दरमहा पैशाची मागणी करणे, पैसे न देणाऱ्या कामगारांवर बेकायदेशीरपणे कारवाई करून कामावरून कमी करणे, दिवाळी सानुग्रह अनुदान रक्कम आदी प्रश्नांबाबत कामगार उपायुक्तांसमवेत बैठक झाली.

देशाच्या उभारणीत तरुणांच्या कौशल्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाचे प्राधान्य

सहाय्यक कामगार आयुक्त पडियाल, कामगार अधिकारी अमोल जाधव, महावितरण प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद प्रादेशिक संचालक कार्यालयाचे सह उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, सह संघटन मंत्री तात्यासाहेब सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच सर्वात कमी करोना रुग्णांची नोंद

Leave a Reply

Your email address will not be published.