मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई दि.२० – मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज मुंबईत केली. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेचे अन्य पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत.

एक रात्र कवितेची….. काव्यरसिक मंडळाचा अनोखा उपक्रम

मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची विशेष बैठक काल परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात पार पडली. बैठकीत २०२२ चे पुरस्कार नक्की करण्यात आले.
प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार शशिकांत सांडभोर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टीव्ही पत्रकाराला दिला जाणारा पुरस्कार “न्यूज १८ लोकमत” चे मिलिंद भागवत यांना देण्यात येणार आहे.

मुंबई ते पुणे महामार्गावर ई शिवनेरी बस धावणार – येत्या १ मे पासून सुरूवात,

पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा “प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार” सकाळचे पत्रकार मारूती कंदले यांना दिला जात आहे..
महिला पत्रकारांसाठी दिला जाणारा “सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कारासाठी” यावर्षी मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांची निवड करण्यात आली आहे..
अकोला येथील पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना दिला जात आहे.

मराठीचे गुण दखलपात्र नसल्याच्या शासन निर्णयाने मराठी विषय सक्तीचा उरणारच नाही निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

मराठवाड्यातील पत्रकारांसाठी असलेला नागोजीराव दुधगावकर पुरस्कार यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार स. सो खंडाळकर यांना देण्यात येत असून कोकणातील पत्रकारासाठीचा रावसाहेब गोगटे पुरस्कार संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना दिला जात आहे. दत्ताजीराव तटकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रायगड जिल्ह्यातील पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे रायगड प्रतिनिधी मोहन जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे.. मे महिन्याच्या तिसरया आठवड्यात मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.