18 गुन्ह्यातील 12 आरोपीना मानपाडा पोलिसांनी केली अटक
डोंबिवली दि.२६ – परिसरात गेले काही महिने गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेऊन मानपाडा पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन ,नाकाबंदी ,फरार व जेल मधील सुटलेले आरोपी यांच्यावर लक्ष ठेवून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 18 गुन्हे उघडकीस आणले असून 12 गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. पोलीस उपायुक्त विवेक फणसाळकर यांनी आज पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.
घरफोडी ,चोरी ,चेन खेचणे ,मोबाईल चोरी आदी प्रकार वाढले होते. यामुळे मानपाडा पोलिसांनी नाकाबंदी केली. कोबिग ऑपरेशन केले व गुन्हेगार जेरबंद केले यामध्ये 18 गुन्ह्यातील 12 आरोपीना अटक करून त्याच्याकडील 11 लाख ,40 हजार व 524 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रसंगी सहाययक पोलीस आयुक्त दिलीप राऊत मानपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे आदी हजर होते.