खुल्या गटात मारली चिमुकल्यानी बाजी. जरा जपून चालव होरी गाण्यावर थिरकली मोठी जुई शाळेची मुले.
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.०८ – महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोकण विभागीय व रायगड व ठाणे जिल्हा संयुक्त विद्यमाने सन २०१८/२०१९ या वर्षी कोकण सरस उमेद या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम घेणेत आले होते.या स्पर्धेत १८ समुह नृत्य सादर केली होती. त्यामध्ये उरण तालुक्यातील रा. जि.प. प्राथमिक शाळा मोठी जुई या शाळेने नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून १०,०००रू. मात्र व प्रशस्तीपत्र मिळवून पुन्हा एकदा उरण शिक्षण विभागाचे नाव पटलावर ठेवल्याबद्दल सर्व नृत्य कलाकार विद्यार्थी, मार्गदर्श, सर्व शिक्षकवृंद, शाळा.
हेही वाचा :- डोंबिवलीत अत्याधुनिक सुविधा असलेले “बाज आर आर हॉस्पिटल
व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षण विभाग उरण व आयोजकांवर विविध स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या बक्षिस वितरण समारंभास पनवेल पं स मा.सभापती तसेच कोकण उपायुक्त देवॠषी,पं स.उरणच्या ग.शि.अधिकारी दिपा परब-गवस मॅडम,उरण पं स कनिष्ठ विस्ताराधिकारी संगिता चंदने मॅडम, विभागातील प्रतिष्ठित समाजसेवक, सर्व विस्ताराधिकारी,सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी,महिला बचत गट प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.