मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली- मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मते तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मते मिळाली.

डोंबिवलीतील नागरी समस्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे

काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे. याआधी सीताराम केसरी हे १९९६ ते १९९८ या काळात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. नंतर सोनिया गांधींनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या घरातील दिवेबंद आणि घंटानाद आंदोलन

निकाल जाहीर झाल्यानंतर शशी थरूर यांनी ट्वीट करून खरगे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणे ही सन्मानाची बाब आहेच पण त्यासोबतच ती मोठी जबाबदारीही आहे, असे थरुर आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

येत्या २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण
——-

Leave a Reply

Your email address will not be published.