कल्याण दि.२९ :- कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ आणि ७ च्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आज सकाळी मध्य रेल्वे मार्गावरील लोकल अर्धातास उशिराने धावत होत्या. यामुळे कल्याणसह मुंबईकडे जाणाऱ्या पुढील स्थानकात मोठी गर्दी उसळली होती.
सकाळी ऐन गर्दीच्या आणि नोकरदार कार्यालयात जाण्याच्या धावपळीत या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल झाले.