माळशेज घाटात कोसळली दरड, वाहतूक पूर्णपणे बंद
पुणे – माळशेज घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, सध्या घाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली. दरड कोसळल्यानं एका ट्रकचा चक्काचूर झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एसटी बस थोडक्यात बचावली. या अपघातात काही जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धुकं आणि पावसामुळे दरड हटवण्यात अपयश येत आहे.
Sources – ABI News
Please follow and like us: