पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत उपराष्ट्रपतींनी, अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींना दिली माहिती; हल्ल्याचा अर्जेटिनाच्या नेत्याकडून निषेध

नवी दिल्ली, दि.१३ – जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती गॅब्रिएला मिचेट्टी यांना माहिती दिली. या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाविरोधातल्या लढ्यात अर्जेंटिना भारताबरोबर असल्याचे अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींनी सांगितले. अर्जेंटिनाचे उपराष्ट्रपती गब्रेरिला मिचेही भारत भेटीवर असून त्यांनी आज नायडू यांची नवी दिल्लीत भेट घेतली. संसदीय कामकाज, द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्यांवर उभय नेत्यांनी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published.