* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> लोकांना घरपण देणारा एक सहृदयी नेता महेंद्र घरत – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

लोकांना घरपण देणारा एक सहृदयी नेता महेंद्र घरत

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.२० :- खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य. आपले नेते – लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे पुढारी यांनी लोकसेवक म्हणून कामकाजात कार्यरत राहून लोकांचे दुःख जाणून घेऊन त्यांचे दुःख हलके करण्यासाठी तन – मन – धनाने त्यांची सेवा करणे आवश्यक आहे हा याचा मतितार्थ. “जनसेवेसाठी काया झिजवावी” या उक्तीप्रमाणे हे सर्व पक्षीय नेते – कार्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे असाच एक नेता अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून गेली ३५ वर्षे धडपडणारा, हजारो कामगारांच्या श्रमाचा मोबदला मिळावा म्हणून गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते जगभरातील ILO, ITF सारखा बलाढ्य संघटनांच्यामार्फत संघर्ष करणारा म्हणून चौफेर त्यांची ख्याती पसरलेली आहे.

हेही वाचा :- ३६ वर्षीय महिलेवर बलात्कार ! ७५ वर्षीय वकिलावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परंतु, या सर्वांच्या पलीकडे आपल्या समवेत असणारे दिन-दलित, सहकारी, मित्र, कार्यकर्ते यांना त्यांच्या सर्व कार्यांत सर्वांगाने मदत करणारा नेता म्हणून हे त्यांचे गुणवैशिष्ट लोकांपासून अनभिज्ञ. शेकडो मंदिरे, शाळांच्या कामांसाठी सढळहस्ते मदत उपलब्ध करून देत असतांना आपल्या सभोवताली बेघर असणाऱ्यांना घरे देऊन त्यांना स्वतःचे घरपण मिळाले. स्वतःच्या हक्काचे छत्र उभारण्यासाठी त्यांना सढळ हस्ते मदत करणारा नेता समाजामध्ये अनेक धनाड्य, अतिधनाड्य, उद्योगपती, नेते आहेत. परंतु आपले ड्रायव्हर, पर्सनल असीस्टंट, सहकारी, कार्यकर्ते यांच्या घरासाठी काडीमात्र मदत करताना दिसत नाहीत. परंतु या नेत्याने मात्र आपले ड्रायव्हर, सहकारी, पर्सनल असीस्टंट, मित्र यांना तर मोफत घरे उपलब्ध करून दिली परंतु शेकडो गोरगरिबांना त्यांची घरे बांधकामासाठी कुठे विटा तर कुठे सिमेंट, दगड तर छप्परासाठी पत्रे, तर अनेक ठिकाणी जे आयुष्यभर चंद्रमौळी घरात राहत आहेत त्यांना पूर्ण घरे बांधून देऊन त्यांच्या घराचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावून दिला.

हेही वाचा :- सराईत गुन्हेगाराला मदत करणे पडले महागात, पोलीस निरीक्षक निलंबित

१ जुन २०२२ रोजी १०० टक्के अनुदानित दोन घरांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यात उल्लेखनीय श्रीमती. घरटकर, आपटा रहिवासी कार्यकर्ते, पतीच्या मृत्यूमुळे घर मोडकळीस आल्यामुळे शेजारीच भाड्याने राहत होत्या. त्यांनी हि व्यथा सांगितल्यावर तातडीने २ महिन्याच्या आत श्रीमती. घरटकर ताईंना बाजूच्या सोसायटीमध्ये वन आर. के. फ्लॅट त्यांच्या नावावर उपलब्ध करून त्यांनी एकही पैसा खर्च न करता त्यांना गृहप्रवेश करून दिला. कर्मवीर आण्णांची शिकवण प्रत्यक्षपणे जगणारा खऱ्या अर्थाने रयत सेवक नेता सर्व राजकारण्यांनी आदर्श घ्यावा असा नेता म्हणजे माणसातला माणूस आपला हक्काचा माणूस कामगार नेते महेंद्र घरत होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *