डोंबिवली ; रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी कल्याणात महावॉकेथॉन
डोंबिवली दि.१९ – रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी राज्यात १५० ठिकाणी राज्यस्तरीय महावॉकेथॉन कल्याण मध्ये आयोजित करण्यात आले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण येथून २ किमी स्पर्धेस सुरुवात झाली. प्रेम आँटो पासून महावॉकेथॉन परत कार्यालयाच्या ठिकाणी येऊन समारोप झाला.
हेही वाचा :- डोंबिवली ; केडीएमटीचे ६ तासात अडीच लाख उत्पन्न विशेष सेवेमुळे प्रवाश्यांनी मानले आभार …
राज्य सरकारच्या परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मोटार वाहन विभाग, सीएएसआय ग्लोबल आणि सीएसआर डायरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजिण्यात आली होती. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या मित्र आणि पालकांसह स्पर्धेत सहभागी होतील,अशी अपेक्षा असून यांच्यामार्फत दररोज रस्ता सुरक्षा, नो हॉर्न, वाहन चालकांची जबाबदारी आणि त्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत समाजात जागरुकता निर्माण होईल, असा विश्वास परिवहन अधिकार्यांनी व्यक्त केली.