* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रम – मुंबई आसपास मराठी
वाहतूक दळणवळण

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रम

मुंबई दि.१९ :- राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात दहा लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जाणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात प्रवास आनंद करताता येणार आहे. एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत.
शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा, राष्ट्रभाषा शिकण्यास प्रेरित करावे: राज्यपाल रमेश बैस
अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना तसेच १२ वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येते. चांगली सेवा आणि अभिनव उपक्रमांमुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडेल अशी कामगिरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *