महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या निकाल – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई दि.१० :- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या (११ मे) रोजी लागण्याची शक्यता आहे. १६ आमदार पात्र की अपात्र ठरतात आणि शिंदे- फडणवीस सरकारचे भवितव्य काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी (उद्या) सकाळी लागणार आहे. तसे संकेतच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत.

वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणी डब्यातील फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाई; ८६ लाखांचा दंड वसूल

आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, राज्यपालांचा बहुमत चाचणीचा आदेश, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचे कार्यक्षेत्र अशा सगळ्या मुद्द्यांवर गेली साडे आठ महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाने दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतले. घटनापीठातील एक न्यायमुर्ती १५ मे रोजी निवृत्त होत असल्याने उद्याच निकाल लागणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागले आहे.  उद्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारताच त्यांनी, मी तुम्हाला हात जोडतो, असे म्हणत याविषयी बोलणी टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आमदार लता सोनवणे यांच्या लेकीच्या विवाहासाठी जळगावात आले होते. विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला.

ठाणे महापालिका निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण

देशात लोकशाही आहे की नाही, देशातल्या विधानसभा आणि संसद या संविधानानुसार काम करतायेत की नाही तसेच न्यायपालिका स्वतंत्र आहे? की कुणाच्या दबावाखाली काम करतीये, याचा उद्या फैसला होणार आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. तर इतके महिने थांबलो, आता २४ तास थांबा सगळे चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. १६ आमदारांना अपात्र केलं ते कुठल्याही आकसापोटी किंवा कुठल्याही अन्य कारणापोटी केले नव्हते. जे काही कायद्याच्या चौकटीत होते त्या नियमानुसार मी त्यांना अपात्र ठरविले. त्यामुळे मी दिलेला निर्णय न्यायदेवता मान्य करेल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.