बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार नसती – राज ठाकरे

पुणे दि.१५ :- राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला संधी देण्याचे आवाहन (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी केले. पुण्यातील कसबा मतदारसंघातील प्रचारसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. त्याचबरोबर सरकारला धारेवर धरण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी मनसेला मतदान करा, असे म्हणत दमडीचाही विकास न करणाऱ्या नेत्यांना का निवडून देता, असा सवाल त्यांनी केला. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा :- वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची १०० रुपयांच्या व्यवहारामुळे हत्या

पुण्यात शिवसेना दिसत नाही, नाशिक आणि पुण्यासारख्या शहरात जागा देत नाही. सत्तेसाठी शिवसेना लाचार म्हणून भाजपाबरोबर युती केली, भाजपा शिवसेनेला मान देत नाही, तरी युती का?, माननीय बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार नसती. आज असं करायची कोणाची हिंमत झाली नसती, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला आहे. ते कसब्यातील सभेत बोलत होते. पुणे, नाशिकमध्ये एकही शिवसेनेचा उमेदवार नाही. भाजपवाले शिवसेनेची रोज इज्जत काढत आहेत. भाजप आज शिवसेनेला मान देत नाही. बाळासाहेब आज असते तर शिवसेना अशी लाचार नसती, असे सांगत त्यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नक्कलही केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published.