मनसेचा नवा फॉर्मूला, सभा रद्द होऊ नये म्हणून शोधली युक्ती

मुंबई दि.११ :- प्रचारासाठी रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी मनसेनं निवडणूक आयोगाकडं मागितली आहे. पावसामुळं जाहीर सभा रद्द करण्याची निमुष्की मनसेवर आली होती. सभांसाठी मैदानं मिळत नसल्यानं मनसेनं ही मागणी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर पावसानं पाणी फेरलं. त्यावर आता मनसेनं नवा उपाय शोधला आहे. मतदानाला अवघे काही दिवस उरले असून परतीच्या पावसानं राजकीय पक्षांची चांगलीचं कोंडी केली.

हेही वाचा :- ठाण्यात राष्ट्रवादी- मनसेचं ठरलं! अविनाश जाधवांचा मार्ग मोकळा

त्याचा पहिला फटका राज ठाकरेंच्या सभेला बसला. पावसामुळं पुण्याती राज ठाकरेंची पहिली सभा रद्द करावी लागली. त्यामुळचं मनसेनं रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. ‘मध्य रात्री 12 ते पहाटे 4 अशा सभा घ्याव्या. सभा घेण्यासाठी रस्ते नाहीत’, असं म्हणत मनसेच्या या मागणीवर पुणेकरांनी खास पुणेकर शैलीत प्रतिक्रिया दिली. तर मुंबईकरांना मात्र कोणतीचं हरकत नाही.

हेही वाचा :- खड्ड्यामुळे तरुणीचा बळी, लग्नाच्या खरेदीवरुन येताना अपघात

सततच्या वाहतूक कोंडीमुळं आधीच वाहन चालक हैराण झाले आहेत. तर तिकडे फूटपाथवर फेरीवाल्यांच्या साम्राज्यामुळं पादचाऱ्यांना वाट काढणं कठीण झालं आहे. अशातच रस्त्यावर सभांना परवानगी दिल्यास सर्वसामान्य नागरिकांची कोंडी होणार हे मात्र नक्की. त्यामुळे मनसेच्या या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.