महामुलाखतीचा महाफुसका बार – शेखर जोशी

अभिनयातील ‘नटसम्राट’‌ नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत घेतली.‌ मात्र इथे मुलाखत कमी आणि निरुपण अधिक अशीच परिस्थिती होती. नाना पाटेकर यांच्या बोलण्यात ‘नटसम्राट’ मधील ‘आप्पासाहेब बेलवलकर’च डोकावत होते.‌ नाना पाटेकर यांनी आता साधे बोलतानाही तीच शैली मुद्दामहून ठेवली आहे का? अशी शंका नव्हे खात्री पटली आहे.‌

 

नाना पाटेकर यांनी जे प्रश्न विचारले ते तिरकस, टोकदार आणि टोचणारे, बोचणारे होते असे काही जण म्हणत आहेत तर या प्रश्नांना शिंदे आणि फडणवीस यांनी आपला संयम कुठेही घडू न देता शांतपणे उत्तरे दिली, म्हणून काहीजण त्यांचे कौतुक करत आहेत. वृत्तवाहिन्यांवर वृत्तनिवेदकांकडून प्रश्न विचारल्यानंतर काही नेत्यांचा पारा कसा चढतो?किंवा ते कसे चिडता हे याआधी आपण पाहिले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ‘मराठी रंगछटा’! – शेखर जोशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोचणारे, अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्यानंतर ते कसे चिडतात, त्रागा करतात तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे हास्याचा एकपात्री प्रयोग असल्याचेही महाराष्ट्राने पाहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस यांनी दिलेली संयमित उत्तरे, शांतपणा नक्कीच कौतुकास्पद आहे. असो.‌

शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी

नाना पाटेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर शिंदे व फडणवीस यांनी दिलेली उत्तरे छापील स्वरूपाची, ठराविक साच्यातील होती. काही प्रश्नांची उत्तरे विस्तृत, मुद्देसूद होती.‌ शिंदे व फडणवीस हे दोघेही कसलेले नेते आहे.‌ नगरसेवक पदापासून ते महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत दोघांनही स्वकर्तृत्वावर मजल मारल्यामुळे त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास जाणवत होता. बोलण्यात
पूर्वपुण्याईचे तुणतुणे, उसने अवसान नव्हते.

काही बोलायचे आहे पण आत्ता बोलणार नाही – राज ठाकरे यांच्या ‘ट्विट’मुळे विविध तर्क- वितर्क

शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरेही विभागली गेली. माझे वडील किंवा भावंडे, मुले यांच्यात दोन गट पडले. तुमची भांडणे कदाचित उद्या मिटतीलही.‌ तुम्ही याला राजकारण म्हणाल. पण आमच्यातील भांडणांचे काय? नाना पाटेकर यांनी व्यक्त केलेल्या या भावना खरोखरच सर्वसामान्यांच्या मनातील होत्या.

(नाना पाटेकर यांना हाच प्रश्न याआधी समाजमाध्यमातून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनाही हा प्रश्न विचारता आला असता, पण त्यांनी विचारल्याचे माझ्या तरी वाचनात नाही)

शिवसेना पक्षात फूट पडण्यास किंवा पाडण्यास फक्त एकनाथ शिंदे हेच जबाबदा/ दोषी नाहीत, टाळी कधीही एका हाताने वाजत नाही हा विचार नाना पाटेकर यांना का सुचला नाही? असाही प्रश्न उपस्थित होतो.

निवडणूक चिन्हांचा रंजक प्रवास – शेखर जोशी

समान नागरी कायद्याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या नेत्यांचे मत जगजाहीर आहे. मग त्याविषयी फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात काय अर्थ होता? की फडणवीस या प्रश्नावर गडबडतील, थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेतील या अपेक्षेने तो प्रश्न विचारला होता?

भाषण नव्हे वाचन – शेखर जोशी

(खरे तर हा प्रश्न नाना पाटेकर यांनी काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कायम मुस्लिमलांगूनचालन करणाऱ्यांना ढोंगी पुरोगामी समाजवादी धर्मनिरपेक्षवादी म्हणणाऱ्यांना विचारायला हवा होता.)

मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का? या प्रश्नावर जोरदार टाळ्या मिळाल्या. यावर‌ शिंदे यांनी २०१९ मध्ये जे व्हायला हवे होते ते आत्ता अडीच महिन्यांपूर्वी घडले असे सांगितले तर फडणवीस यांनी आमची किंमत तुमच्या भरवशावर ठरते आणि तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? असे छापील उत्तर दिले.‌

शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी

आम्ही कर भरत असूनही आमची चौकशी केली जाते, मग तुमची चौकशी का होत नाही? नगरसेवक निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्यधीश असतो. आम्हाला कळते की हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का लक्षात येत नाही? आदी विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरेही ‘ठरलेली’ होती.

त्यात वेगळे काही नव्हते. गुन्हेगार प्रवृत्तीची लोक निवडून येतात त्याचे काय? असा प्रश्नही पाटेकर यांनी विचारला. ( ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण तुम्ही का सुरू केले? कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी का केली नाही? असे प्रश्न पाटेकर यांना पडल्याचे किंवा त्यांनी विचारल्याचे ऐकलेले नाही किंवा वाचलेले नाही) असो.‌

मुलाखत घेणारा असो किंवा कार्यक्रमाचा निवेदक, सूत्रसंचालक असो. त्यांनी स्वतः कमीत कमी बोलावे आणि ज्यांची मुलाखत आहे त्यांना बोलण्यासाठी जास्त वेळ द्यावा, असा संकेत आहे.

कार्यक्रमाचे निवेदन किंवा सूत्रसंचालन करतानाही त्या माणसाने पाल्हाळ लावू नये, श्रोते,मुख्य वक्ते आणि एकूणच कार्यक्रम यांना जोडणारा फक्त दुवा व्हावे अशी अपेक्षा असते. मात्र अपवाद वगळता हा संकेत किंवा ही अपेक्षा सर्रास धाब्यावर बसविली जाते.

महामुलाखतीच्या वेळीही नाना पाटेकर यांनी तसेच केले. प्रश्नांना ‘नाना’कळांची फोडणी देऊन, कधी कीर्तनकार किंवा प्रवचनकार यांनी निरूपण करावे तसे तर कधी ढ तील ढ विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने उपदेश करावा, असा हा प्रकार होता.

काही वेगळे ऐकायला मिळेल या अपेक्षेने मुलाखत पाहायला बसलेल्यांसाठी ही महामुलाखत म्हणजे महाफुसका बार ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published.