* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मधुकरराव चक्रदेव यांचे निधन – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

मधुकरराव चक्रदेव यांचे निधन

डोंबिवली दि.२७ :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, डोंबिवलीतील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक संस्थांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि उद्योजक मधुकरराव चक्रदेव यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बोरिवली- विरार पाचवी, सहावी मार्गिका; खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची काम करण्यास ‘एमआरव्हीसी’ ला मान्यता

आदिवासी दुर्गम भागातील वधू-वरांचे सामुहिक विवाह सोहळे घडवून आणण्यात चक्रदेव यांचा सक्रिय सहभाग होता. डोंबिवली परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून ऑगस्टमध्ये ते स्पर्धा आयोजित करत होते. गणेश मंदिराचे ते विश्वस्त होते.

मुंबई, ठाणे, पालघर परिसरा शनिवार, रविवारी पावसाची शक्यता

डोंबिवली जिमखान्याच्या माध्यमातून अनेक क्रीडाविषयक उपक्रम राबविण्यात, जिमखान्यासाठी शासनाकडून मैदान मिळवून घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृति समिती, डोंबिवली नागरी अभिवादन समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *