‘भावना आणि विवेक यांचे संतुलन साधत विकास करणे हे मदनदास देवी यांचे वैशिष्ट्य’
मुंबई दि.१० :- एखाद्या व्यक्तीच्या जाण्याचे परिणाम संघटनेवर होऊ नयेत तसेच पुढच्या कार्यकर्त्याने त्या व्यक्तीची जागा घ्यावी असे तंत्र दिवंगत मदनदास देवी यांनी विकसित केले होते. भावना आणि विवेक यांचे संतुलन साधत विकास करणे हे त्यांचे वैशिष्ट्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य सुरेश सोनी यांनी येथे केले.
एसटी कामगारांचे येत्या ११ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण – प्रत्येक जिल्ह्यात ‘काम बंद’ आंदोलन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, संघटन मंत्री मदनदास देवी यांची श्रद्धांजली सभा दादरच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या बी. एन. वैद्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सोनी बोलत होते. मदनदास देवी यांच्याकडे केवळ संघटना देशव्यापी करणे, सक्षम करणे एवढेच लक्ष्य नव्हते. तर संघटना विकसित करण्याची त्यांच्याकडे विशेष क्षमता होती, असेही सोनी यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या ‘सिनेट’साठी येत्या १० सप्टेंबरला मतदान
या श्रद्धांजली सभेत अरुण करमरकर, निर्मला आपटे, सतीश कुळकर्णी, रवी एरंडे, गीता गुंडे, संजय पाचपोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. देवी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनाचे विविध पैलू वक्त्यांनी सांगितले. विलास भागवत यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.