शिवजयंती सोहळा २०१९ (वर्ष ४ थे) निमित्त भव्य रांगोळीतून साकारले श्री शिव छत्रपती.
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.१९ – कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उरण-पागोटे गावामध्ये १९.६ फूट रुंदी x ३३ फूट लांबीची (६४६ चौरस फुट) आकर्षक सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीसाठी ५५ किलो रंग व ४७० किलो मिठाचा वापर करण्यात आला. व रांगोळी काढण्यासाठी सुमारे ११:३० तास लागले. यासाठी संतोष का. पाटील, नकुल य. पाटील, पंकज ह. पाटील, सुमित चं. पाटील, निनाद न. पाटील, धीरज भ. पाटील, भावेश बा. शेळके, दीपक हं. निनावे, साहिल कडू (सोनेरी), संदेश सु. पाटील, अंकित.गणेश य. पाटील, हरिश्चंद्र द. पाटील, वैष्णव नि. पाटील आदि शिवप्रेमींनी विशेष मेहनत घेतली.
हेही वाचा :- भारतीय हॅकर्सचा पाकिस्तानवर ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राइक’, २०० हून अधिक वेबसाईट्स हॅक
Please follow and like us: