फलाट सोडून लोकल तीन डबे पुढे – विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
विठ्ठलवाडी दि.११ :- कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणा-या जलद लोकलचे पहिले तीन डब्बे फलाट सोडून पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडला.
१० वाजून ३२ मिनिटांची ही लोकल विठ्ठलवाडी स्थानकात दहा मिनिटे उशिराने आली. मात्र लोकलचे तीन डबे फलाट सोडून पुढे गेल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. प्रवाशांना उड्या मारून लोकलमधून उतरावे लागले. अनेक प्रवाशांची धावाधाव झाली.
सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षित निकाल दिला – मुख्यमंत्री शिंदे
फलाट सोडून लोकल पुढे गेल्यावर काही वेळासाठी सिग्नल यंत्रणाही बंद पडली. मोटरमनच्या चुकीमुळे की अन्य काही कारणाने हा प्रकार घडला याची माहिती मिळू शकलेली नाही. लोकल फटालाट न थांबता पुढे जाऊन थांबली. त्यामुळे अनेक प्रवाशांची कोंडी झाली. ज्यांना लोकलमधून उतरायचे होते त्यांना थेट लोकलमधून उड्या माराव्या लागल्या. यात महिला प्रवाशांचे हाल झाले.