लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी स्थानिक भुमीपुत्रांचे 24 जून रोजी सिडकोला घेराव. 

आंदोलनात सहभागी होण्याचे स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांना आवाहन. 
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात 24 जून रोजी सिडको भवनाला घेराव घालण्यात येणार आहे. या घेराव आंदोलना बाबतच्या नियोजन, आखणी व अन्य बाबींबाबत चर्चा व मार्गदर्शन व्हावे याकरिता गुरुवार दिनांक 17 जून रोजी सायं. ठिक 5:30 वा बैठक शिरवणे विद्यालय, सेक्टर 02, नेरुळ याठिकाणी संपन्न झाली. या बैठकीस सर्व स्थानिय समिती समन्वयक,ग्राम समन्वयक व या लढ्यासाठी पुढील काळात सतत कार्य करण्यास इच्छुक असलेले भूमीपुत्र  उपस्थित होते.
यावेळी नवी मुंबई मुख्य समन्वयक मनोहर पाटील, डॉ.राजेश पाटील, दशरथ भगत, दिपक ह.पाटील, माजी नगरसेवक रामचंद्र घरत, घनश्याम मढवी, विनोद विनायक म्हात्रे, गिरीश म्हात्रे, निलेश पाटील, विजय पाटील, चेतन पाटील,  शिवचंद्र पाटील, शैलेश घाग, सुनील पाटील, राजेश मढवी, मनोज मेहेर, संदिप पाटील, सविनय म्हात्रे, ऍड शिल्पा पाटील, संतोष सुतार, दिगंबर पाटील, सुरेश वास्कर व 29 गावांतील ग्राम समन्वयक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
     नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनायक दि. बा. पाटील नामकरणासाठी प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र व शहरातील विविध घटकांतील नागरिक हे सर्वजण सरकार विरोधात संघर्ष करण्यास उतरले आहेत. 10 जून रोजी झालेल्या मानवी इशारा साखळी आंदोलनात सर्वांनी बेलापूर ते दिघा या ठाणे बेलापूर पट्टीतील सर्वच भूमीपुत्र व शहर तसेच झोपडपट्टीतील नागरिक, लोकप्रतिनिधी, उरण पनवेल, रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त यांनी अत्यंत शांततेने व शिस्तीने उतरून जी एकजूट दाखवून दिले  त्याबद्दल त्यासर्वांचे  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र समितीच्या वतीने आभार या बैठकीत मानण्यात आले.
       या संघर्षांतील यापुढील पाऊल आहे, ते म्हणजे येत्या 24 जून रोजी स्वर्गीय दि. बा.पाटील साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच सिडको भवनाला लाखोंच्या संख्येने मोर्चा नेऊन घेराव घालायचा आहे. ज्यात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण व अन्य तालुके त्याचप्रमाणे आपली नवी मुंबईतील सर्व गावे, ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील आगरी, कोळी, कराडी, भंडारी, कुणबी व इतर समाज व विशेषतः मूळ भूमीपुत्रांची साथ देखील लाभुन आपल्या सर्वांचे हाथ संघर्षासाठी अधिक बळकट होणार आहेत.त्यामुळे सर्वांनी पूर्ण तयारीनिशी ताकदीने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती व नवी मुंबई महापालिका क्षेत्र समितीच्या वतीने यावेळी करण्यात आले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email