कर्जाचे आमिष दखवुन साडे सहा लाखांचा गंडा

डोंबिवली दि. २४ – व्यवसायासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवत महिलेला तब्बल सुमारे ६ लाख ४६ हजारांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात विपीन कुमार या भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. डोंबिवली पूर्वेकडील कल्याण बदलापूर रोड कासा विंटो लोकशोर विंस मध्ये राहणारे सजनी पिल्ले ही महिला राहते. पिल्ले याना विपिनकुमार नावाच्या इसमाने गेल्या चार महिन्यापूर्वी व्यवसायासाठी कर्ज काढून देतो असे अमिश दाखवले तसेच पैशांची मागणी केली.

या आमिषाला भुलून पिल्ले यांनी विपिनकुमार च्या सांगण्यावरून गेल्या चार महिन्यात विविध बँकांमध्ये विविध खात्यामध्ये ६ लाख ४६ हजार ३१६ रुपये भरले. पैसे देऊन चार महिने लोटले मात्र कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलिस स्थानाकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विपिनकुमार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email