महिलेची छेड काढणा-या पोलिसाला बदडले- सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल Live…
कल्याण – कल्याण रेल्वे स्टेशनवरील ४ नंबर फलाटावर अत्यंत धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. पोलिसाने एका महिलेची छेड काढतानाचे दृश्य व्हिडीओतून स्पष्ट दिसून येत आहे. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी बसायला असलेल्या बाकडयांवर काही प्रवासी बसलेले होते. तेथे त्या प्रवाशांसोबत या बाकडयांवर एक पोलीस कर्मचारीही बसला होता. दोन महिला आणि एक लहान मुल बेंचवर बसले होते. दोघीपैकी एक महिला तिच्या लहान मुलाला दूध पाजत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्यावेळी शेजारी बसलेल्या पोलिसाने महिलेच्या पाठिवर हात फिरवण्यास सुरुवात केली. त्या सर्व प्रवाशांच्या समोर उभे असलेल्या काही मुलांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून तो प्रकार सर्वांंच्या समोर आणून दिला. पोलीसाकडून झालेलं हे कृत्य पाहून संतापलेल्या एका माणसाने पोलिसाला मारहाणही केली. पण तरीही तो पोलीस कर्मचारी निर्लज्जासारखं उलट उत्तर देत होता. पोलीस असल्याचा माज दाखवत माझ्यासोबतच तक्रार दाखल करायला चला, असं उर्मटाप्रमाणे उत्तर देताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवर असेलल्या काही जणांनी शूट केली आहे. स्टेशनवरील प्रवाशांनी नंतर रेल्वे पोलिसांना बोलवून त्यांच्या ताब्यात आरोपीला देण्याची मागणी केली. इतरांनी या महिलेला पोलिसाविरोधात सबळ पुरावा असल्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार करण्याची विनंती केली. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपी पोलिसाविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.