कोपर पूल 28 ऑगस्ट पासून संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देश

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.११ :- डोंबिवली पूर्व  पश्चिम जोडणारा कोपर उड्डाण पूल चाळीस वर्षापूर्वीचा उड्डाणपूल दुरुस्तीसाठी येत्या 28 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद करण्याचे  निर्देश मध्य रेल्वेने दिले. डोंबिवलीत सध्या वाहतूक कोंडीची समस्या असतांना जर हा पूल बंद झाला. तर मोठा हाहाकार उडणार आहे. येत्या 8 दिवसात पुलावरील महावितरणच्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या, फुटपाथ व पुलावरील डांबराचे थर कमी करण्यास सांगितले आहे. मध्य रेल्वे अभियंता विभाग व पालिका अधिकारी यांनी 8 ऑगस्ट रोजी कोपर पुलाची पहाणी केली त्यानंतर रेल्वेने महावितरण व पालिका यांना पत्र पाठवून पुलावरील केबल हटवण्याबरोबर फुटपाथ व डांबराचे थर काढण्यास सांगितले आहे. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण करण्यासही बजावले आहे.

हेही वाचा :- पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन.

रेल्वेचे अधिकारी व पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी व कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा हे पण त्याच्या सोबत होते. गेले 4 महिने कोपर पुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद असून ती नव्या पुलावरून होत आहे यामुळे आताच वाहतूक कोंडी होत असताना जर संपूर्ण वाहतूक पूर्व पश्चिम बंद केली तर मोठा पेच निर्माण होणार आहे यामुळे पूर्व पश्चिम वाहतूक नव्या पुलावरून करावी लागणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. रेल्वेने कोपर पूल बंद ठेवण्याचा दुराग्रह केल्याने पालिकेचे अधिकारी त्रस्त आहेत. या संदर्भात कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांना विचारले असता त्यांनी पहाणी केल्याचे मान्य केले व 28 ऑगस्ट पासून पूल पूर्ण वाहतुकीला बंद असेल अशी शक्यताव्यक्त केली. डोंबिवली महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारले असता त्यांनी रेल्वेचे पत्र आले असल्याचे मान्य केले ते म्हणाले रेल्वेने केबल काढण्यास सांगितले.

हेही वाचा :- आगरी कोळी कराडी समाजाच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी होणार नवीन संघटना स्थापन.

हे खरे असले तरी रेल्वेनेच ते केबल टाकून दिले ते त्यांनीभूमीगत करून द्यावे शिवाय महत्वाचे म्हणजे जर केबल काढली तर यावरून डोंबिवली पश्चिमेचया 30-35हजार नागरिकांचा वीज पुरवठा खंडित होणार आहे डोंबिवली नवापाडा येथील ओव्हरहेड वायर्स टाकण्याची मागणी करत असून ती परवानगी देण्यास रेल्वे तयार नाही अशी खंत त्यांनीव्यक्त केली. कोपर येथील हा उड्डाणपुल सुमारे 40 वर्षांपूर्वीचा असून पालिका प्रशासन या पुलाकडे योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. 28  ऑगस्ट पासून जर पुलावरील वाहतूक बंद केली. तर डोंबिवलीत वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. रेल्वेने हटवादी भूमिका सोडून डोंबिवलीतील परिस्थिचा विचार करण्याची गरज असून अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार हे नक्की 

kdmc अधिकारियो की लापरवाही उजागर, Dombivli railway Station के पास युवक मेन होल में फसा
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email