पूरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश – जेनेलिया केली 25 लाखांची मदत

मुंबई दि.१२ :- गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुर, सांगलीमध्ये पावसाने जो थैमान घातला त्यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालं. आता पाऊस थांबला असून अनेक भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. . पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे सरसावले आहेत. सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी पूरग्रस्त भागांमध्ये शक्य तेवढ्या मदतीचा हात पुढे केला आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीतील ‘फ’ प्रभाग सभापतींच्या वॉर्डात सव्वाशे खड्डे वाहनचालकांनीच खड्डे मोजले

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाने देखील पुरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे त्या दोघांनी २५ लाखांचा चेक सोपावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे.

हेही वाचा :- पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ‘रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांचे योगदान दिले आहेत, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.’ अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी दोघांचे आभार मानले आहेत.

३७० पर लद्दाख से युवा सांसद ने विरोधियो की अभूतपूर्व धुलाई की. विपक्ष की बोलती बंद कर दी.

Leave a Reply

Your email address will not be published.