येत्या २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण
(ठाणे आसपास प्रतिनिधी)
ठाणे दि.१८ :- यावर्षी दिवाळीत मंगळवार,२५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळेल, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
हेही वाचा :- मन कस्तुरी रे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण यूरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी ४-४९ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायंकाळी ५-४३ वाजता असून त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकेल. आकाशात पश्चिमेला हे दृश्य पाहता येईल, असेही सोमण यांनी सांगितले
हेही वाचा :- बिग बॉस मराठी’च्या घरातून निखिल राजेशिर्के बाहेर
ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी ६-०८ वाजता सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. यावर्षी दिवाळीमध्ये सूर्यग्रहण येत असले तरी २५ ऑक्टोबर या दिवशी कोणताही सण नाही, असेही सोमण म्हणाले.
(चौकट)
शुक्रवार २१ ऑक्टोबर- वसुबारस
शनिवार २२ ऑक्टोबर- धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन
सोमवार २४ ऑक्टोबर- नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी- कुबेरपूजन.
बुधवार २६ ऑक्टोबर- बलिप्रतिपदा आणि भाऊबीज