कडोंमपा पोट निवडणूक, सेटिंग झाली की विरोधकांना उमेदवार मिळाले नाहीत ?

( बालकृष्ण मोरे )

कल्याण / कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ रामबाग खडक मध्ये पोट निवडणूक होत आहे.येथील नगरसेविका वैजयंती घोलप यांची निवडणूक न्यायालयाने अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. पण या प्रभागात विरोधी पक्षांनी आपला उमेदवार न दिल्याने सेनेचे सचिन बासरे ही बिनविरोध निवडून आले आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप सेना युतीला मोठी बढत मिळाली होती.विरोधी पक्ष नावाला शिल्लक राहिला अशी विरोधकांची अवस्था झाली होती.पण महापालिकेच्या या पोट निवडणुकीत काँग्रेस , राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन पक्ष तसेच नव्याने निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी आपला उमेदवार उतरवून आपले अस्तित्व दाखवतील अशी अपेक्षा असताना या पक्षा पैकी एकाही पक्षाने उमेदवार न दिल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्या समोर नांगी टाकली का असा प्रश्न विचारला जात आहे.

२६ नंबर रामबाग खडक हा प्रभाग इतर मागासवर्गीया साठी राखीव प्रभाग आहे.या प्रभागात राष्ट्वादी काँग्रेस तर्फे उमेदवार देण्या बाबत खलबते केली गेली, पण त्यांना उमेदवार सापडलाच नाही.तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला या प्रभागात पोटनिवडणूक होणार आहे, बाबत कल्पना असून त्यांनी प्रभागात उमेदवार दिला नाही.मनसे मध्ये ही येथे निवडणूक होणार अशी फक्त चर्चा झाली, तसेच इतर पक्षांना येथे पोट निवडणूक होत आहे याची कल्पना होती की नाही या बाबत माहिती नाही.

या विरोधी पक्षांनी या पोट निवडणुकीत उमेदवार न दिल्याने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवा मुळे विरोधी पक्ष खचले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे की विरोधी पक्षांनी येथे केलेल्या सेटिंग मुळे त्यांनी आपले उमेदवार दिले नाहीत या बाबत नागरिकां मध्ये चर्चा रंगली असल्याचे दिसून येत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email