केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली
मुंबई दि.२३ :- केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली आली आहे. देशपातळीवर तिची २५ वी श्रेणी आहे.
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे २६ मे रोजी उदघाटन
लहानपणापासून कश्मिराने ‘यूपीएससी’ चे स्वप्न पाहिले होते. तिची आई तिला किरण बेदी यांच्यावरील बातम्यांची कात्रणे दाखवायची. तेव्हापासूनच नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याचे तिने ठरविले होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल
कश्मिराचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले असून तिने मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालयातून दंत शल्यविशारद पदवी मिळविली आहे.