शबरी सेवा समितीतर्फे नवरात्रोत्सवात कन्यापूजन कार्यक्रम
डोंबिवली दि.२६ :- शबर सेवा समितीतर्फे यंदाही नवरात्रोत्सवात कन्यापूजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दहा तालुक्यातील ३१७ गावांमध्ये कार्यक्रम पार पडले. सर्व ठिकाणचे कार्यक्रम स्थानिक महिला,पुरूषांनी आयोजित केले होते. कन्या पूजनातील विशेष बाब म्हणजे मुलींचे वडील, आजोबा, काका यांचा सहभाग वाढला होता.
‘वयम्’ चळवळीच्या’ मिलिंद थत्ते यांचे व्याख्यान
पहिल्या/ दुस-या वर्षी मुलींचे पाय आम्ही कसे धुणार? असे म्हणणा-या पुरुष मंडळींनी यावेळी आवर्जून आपल्या मुलींचे, नातीचे पाय धुतले आणि त्यांना मनःपूर्वक वाकून नमस्कारही केला. अनेक ठिकाणी मुलींना भेट वस्तू तर काही ठिकाणी मुलींना गोड जेवण देण्यात आले.
सरकारला वेळ नसेल तर नवी मुंबई मेट्रोचे उदघाटन आम्ही करू- विजय वडेट्टीवार
हे कार्यक्रम शाळेत, घरात, मंदिरात, नवरात्रोत्सव मंडपात अशा विविध ठिकाणी झाले. समाजात मुलींना सन्मान मिळावा, डोंगर द-यातील आणि ग्रामीण भागातीलही मुलींचा जगण्याचा झोका असाच उंच उंच जावा यासाठी शबरी सेवा समितीची ही जनजागृती चळवळ असल्याचे शबरी सेवा समितीचे प्रमोद करंदीकर यांनी सांगितले.