कल्याण ; बेकायदेशीर रित्या गाय बैलची वाहतूकीच्या संशयावरून ट्रक मालकासह चालक क्लिनरला बेदम मारहाण
डोंबिवली दि.०८ – एका ट्रक मधून बेकायदेशीररित्या गाय बैलांची वाहतूक करीत असल्याच्या संशयातून सात तरुणानी ट्रक मालकासह चालक व क्लिनरला बेदम मारहाण केल्याची घटना कल्यानात उघड झाली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात सात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :- डोंबिवली ; यूएलसी कोट्यातून घराचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास एक ट्रक पुणे येथून २० म्हशीचे पारडे कल्याण व भिवंडी येथे बाजारात वाहतूक करून येत होते.यावेळी रोहित परब,अतुल शिंदे,निखिल माने,जितेश भोईर,शुभम गोवेकर,रोशन जगताप यांच्यासह सह एका अज्ञात तरुणाने या ट्रक मधून गाय बैलांची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या संशयातून ट्रक चालक मालक व क्लिनर ला बेदम मारहाण केली या प्रकरणी या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.