Kalyan ; मद्यधूंद अवस्थेत रुग्णवाहिकेच्या चालकाला वेळेतच पकडल्याने दुर्घटना टळली  

डोंबिवली दि.२७ :- मद्यधूंद अवस्थेत रुग्णवाहिका चालविणाऱ्या चालकाला वाहतूक  पोलिसांनी पकडल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळली आहे. हि घटना कल्याणाच्या पत्रीपुलानजीक घडली आहे. या रुग्णवाहिकेच्या चालकासह त्याच्या साथीदाराला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून सुदैवाने या  रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता.  राकेश रामदयाल पाठक असे मद्यधूंद अवस्थेत रुग्णवाहिका चालविणाऱ्या चालकाचे नाव आहे.

हेही वाचा :- Dombivli ; मोटारसायकल चोऱ्यांचा सपाटा

कल्याण – डोंबिवली शहराला जोडणारा पत्रीपूल आहे. यापुलावर चोवीस तास मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी  फोडण्यासाठी वाहतूक  कर्मचाऱ्यांची दिवस-रात्र नेमणूक करण्यात आली आहे. त्यातच बुधवारी  रात्री साडेनऊच्या सुमारास कल्याणहुन नेतेवलीकडे  भरधाव वेगाने रुग्णवाहिका जात होती.  रुग्णवाहिका पत्रीपूलावर  येताच  चालकाने पुलावरील दुभाजकाला जोरदार  धडक दिली. यामुळे पुलावर एकच गोंधळ उडाला होता.

हेही वाचा :- ‘भाई का म्हणत नाही’असा जाब विचारत तरुणावर कोयत्याने वार

तर अपघात होताच तात्काळ वाहतूक  पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता  चालक व त्याचा भाऊ दोघेही मद्यधूंद अवस्थेत रुग्णवाहिका चालवीत असल्याचे आढळले. त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची तपासणी केली असता जास्त प्रमाणात मद्यपान केल्याचे आढळून आले होते. सुदैवाने या  रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता.  हि रुग्णवाहिका कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असलेल्या पंचगण्य चिकित्सालय यांच्या मालकी असून पोलिसांनी दोघांवर वेळेत कारवाई केल्याने अपघाताची मोठी दुर्घटना टळल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक  सुखदेव पाटील यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published.