कल्याण ; मोदींच्या स्वागतासाठी शहराची डागडुजी सुरू
कल्याण दि.१४ – एरवी शहरातील विविध ठिकाणांच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे पालिका प्रशासन पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने खडबडून जागे झाले आहे. ज्या मार्गाने मोदी सभा स्थळी जाणार आहेत, त्या रस्त्यावरील चौक तसेच फूटपाथ आदींची युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पालिकेने सुरू केले आहे. गेली कित्येक वर्षे पालिका मुख्यालयासमोर असलेल्या शंकरराव चौकाची दुरवस्था झाली होती.
हेही वाचा :- स्टार्ट-अप्सना लवकरच जीईएम मंचावर आणले जाणार
मात्र पंतप्रधान मोदी हे हेलिकॉप्टरने सुभाष मैदान येथे उतरणार असून शंकरराव चौक येथूनच ते लाल चौकी येथील फडके मैदान या सभा स्थळी जाणार असल्याने या चौकाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फडके मैदानाच्या आसपासच्या फूटपाथांच्यादेखील दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ पंतप्रधान अथवा एखादे मंत्री संत्री आल्यावरच पालिका प्रशासन शहरांतील कामें करणार का? असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.