कल्याण ; खेळत असताना दगड फेकल्याच्या वादातून मुलासह आईला मारहाण

कल्याण दि.०५ – कल्याण पश्चिम मंगेशी पार्क सुवर्णा सपकाळे हि महिला राहत असून दुपारच्या सुमारास याच इमारती मध्ये राहणारे सम्राट सरवदे त्याची आई व वडील हे तिघे त्यांच्या घरात आले. त्यांनी तुझ्या मुलाने क्रिकेट खेळत असताना दगड मारला असे म्हणत. त्यांच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :- डोंबिवली ; रिक्षा चालक व दुचाकीस्वराच्या भांडणात त्रिकुटाने दुचाकी केली लंपास

दरम्यान सपकाळे मुलाला सोडवण्यासाठी पुढे गेल्या असताना त्यांनी सपकाळे यांना धक्काबुकी केली. तसेच मुलाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सम्राट सरवदे त्याची आई व वडील विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.