Kalyan ; एसटी डेपोत चोरट्यांचा सुळसुळाट

कल्याण दि.०१ :- कल्याण पश्चिमेकडील एसटी डेपो परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने प्रवाशांचा मोबाईल, पाकीट चोरण्याचा सपाटा लावला आहे. कल्याण जवळच्या बापगाव नाक्यावरील वास्तु रचना वृंदावन इमारतीमध्ये राहणारे दीपेश जंगम हे शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी कल्याणच्या एसटी डेपो येथून बस पकडत होते.

हेही वाचा :- कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले बिनविरोध विधानसभा अध्यक्ष

एका बसमध्ये चढत असताना अमर शेख नावाच्या चोरट्याने हातचलाखीने त्यांच्या खिशातील रोकड काढून घेतली. काही क्षणातच जंगम यांना खिशातील पैसे कुणी तरी काढून घेत असल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ आरडाओरड करत नागरिकांच्या मदतीने अमरला पकडले आणि महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी अमर शेख या चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email