कल्याण ; सोनाराला लाखोंना गंडवले
कल्याण दि.१२ – कल्याण पश्चिम आग्रा रोड महावीर शॉपिंग सेंटर येथे राहणारे नितीन जैन यांचे स्टेशन रोड वर छोगमल ज्वेलर्स दुकानं आहे. काही दिवसांपूर्वी एक अनोळखी इसम त्यांच्या दुकानात आला त्याने चैन खरेदी करायचा बहाणा करत बोलण्यात गुंतवले. या इसमाने नितीन यांच्या दुकानातून ५० ग्राम वजनाच्या तीन सोन्याच्या चैन विकत घेतल्या.
हेही वाचा :- कल्याण ; हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण
त्या मोबदल्यात मोबाईल बँकिंग वरून १ लाख ७२ हजार रुपये पाठवल्याचे सांगत ताशा आशयाचा किमतीच्या मेसेज जैन यांना पाठवला मात्र काही वेळाने त्यांना पैसे मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलीस्णाई अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: