Kalyan ; सात वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

कल्याण दि.१२ :- एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली असून कल्याण पश्चिम परिसरात राहणारी पीडित मुलगी पहिलीच्या वर्गात शिकते. पालकांनी या मुलीला शाळेत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी रिक्षा ठरवून दिली होती. शाळा सुटल्या नंतर ही चिमुरडी शाळेबाहेर रिक्षाची वाट पाहत थांबायची.

हेही वाचा :- केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

हीच संधी साधत शाळेसमोर दुकाने थाटून बसलेल्या विक्रम पुरोहित (१९), नवीन जसुजा (२४) आणि अजय दोहारे (३४) यांनी या चिमुरडीची ओळख काढत तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत शाळेसमोर असलेल्या मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करत असत. रिक्षाचालक तिला परत नेण्यासाठी येण्यापूर्वीच ते तिला परत शाळेबाहेर आणून सोडत असल्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही.

हेही वाचा :- २ ऑक्टोबर रोजी मराठा मंडळ ठाणे तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

हीच संधी साधत नराधम आरोप मागील अनेक महिन्यांपासून या चिमुरडीवर वारंवार सामूहिक अत्याचार करत होते. मात्र या चिमुरडीच्या वागण्यात अचानक बदल झाल्यामुळे आजीला संशय आल्याने आजीने तिला याबाबत विचारल्यानंतर तिने आपल्याबरोबर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. यानंतर पालकांनी या तीन नराधमांविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोक्सा कायद्यांतर्गत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

Plastic banned 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email