Kalyan ; मोटारसायकल चोऱ्या वाढल्या

Hits: 0

कल्याण दि.३० :- कल्याण-डोंबिवलीत मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून बुधवारी एकाच दिवशी दोन मोटारसायकल चोरीला गेल्या. डोंबिवली पूर्वेतील महात्मा गांधी रोडवरील उषा इमारतीत राहणाऱ्या राजेश मोहन देशपांडे (45) यांनी आपली मोटारसायकल सुभाष रोडवरील देवदत्त सुपर मार्केट समोर पार्क केली असता चोरीला गेली.

हेही वाचा :- Dombivali ; पर्समधील रोकड चोरी

दुसऱ्या घटनेत कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील शंकर कॉलनीत राहणाऱ्या कांतीलाल मोहन बाबरीया (43) यांनी आपली मोटारसायकल विठ्ठलवाडी बस डेपोसमोर पार्क केली असता चोरीला गेली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णूनगर व कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.