कल्याणचे पत्रकार आशिष पाठक यांचे निधन
कल्याणातील सर्वांचेच आवडतेपत्रकार आशिष पाठक यांचे आज निधन झाले ते ३८ वर्षांचे होते. गेले काही महिने ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा,पत्नी, वृद्ध आई वडील विवाहित बहीण असा परिवार आहे. आशिष्याच्या अकाली निधनाने नव्या पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ते महाराष्ट्र टाईम्स साठी ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम पहात.
हेही वाचा :- कल्याणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या
आकाशवाणी, मराठी वाहिन्यांवरही त्यलेखनवृत्तनिवेदक म्हणून जबाबदारीने काम पाहिले, मराठीचे अभ्यापूर्ण वाचन, लेखनात नवीन नवीन शब्दांचवापर माहितीपूर्ण विषयाची मांडणी. यामुळे त्यांचे लेखन वाचनीय होत असे. राजकीय लेखनात वयक्तिक टीका कधीही केली नाही. त्याबरोबरच वास्तववादी लेखनावर त्यांचाभर असे. निवडणूक काळातील त्यांची वर्तपत्रे वास्तववादी-तितकीच अभ्यासपूरणासात. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच केडीएमसीच्या महापौर विनिता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर माजी आमदार प्रकाशभोईर, शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख विजय साळवी, पत्रकार सुचिता करमरकर, राजलक्ष्मी, प्रकाश पेनकार,संजय पाटील, पत्रकार संघाचे विष्णुकुमार चौधरी, विनायक बेटावडकर आदींनी घरी जाऊन दर्शन घेतले.