कल्याण ; अश्लील व्हिडियो दाखवून करायचा अल्पवयीन मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार

कल्याण दि.३० – आपली पत्नी कामावर गेल्याची संधी साधत हा नराधम सावत्र बाप अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडियो दाखवून सातत्याने तीन वर्षे तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करत होता. या जाचाला कंटाळून पीडितेने घडला प्रकार आपल्या आईला सांगितला. सावत्र बापाची हे कृत्य एकूण आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आतीक शेख या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. सदर पीडित १५ वर्षीय मुलगी मुलगी आपल्या आई व सावत्र बाप आतीक शेख याच्या सोबत कल्याण पश्चिम बैलबाजार परिसरात राहते. आतीक शेखची या पीडित मुलीवर वाईट नजर होती. पत्नी कामावर गेल्यानंतर आतिक त्या मुलीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करायचा. अखेर तीन वर्षांपूर्वी त्याने डाव साधला.

हेही वाचा :- कल्याणात घरफोडी

पत्नी कामावर गेल्याची संधी साधत त्याने पीडितशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. या विकृत नराधमाने तिला अश्लील व्हिडियो दाखवून अमानुष अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास आईला मामाला ठार मारेन अशी धमकी दिली. तीन वर्षे सातत्याने हा नराधम तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करत होता. या घटनेमुळे ती मानसिक तणावाखाली होती. याचा परिणाम तिच्या अभ्यासावर झाला तिची वागणूक बदलली होती. अखेर मुलीच्या वागणुकीबद्दल तिच्या आईला संशय आल्याने तिने याबाबत पीडितेला विचारला. त्यावेळी तिने घडला अत्याचाराची कहाणी आपल्या आईजवळ कथन केली. पिडीत मुलीच्या आईने अंजुमन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आजम शेख यांच्याशी संपर्क साधला. वशेख यांच्या सोबत बाजारपेठ पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारी नुसार पोलिसांनी आतीक शेख या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email