कल्याण: कचराप्रश्नावर तातडीने कार्यवाही नाही झाली तर पगार थांबवेन – मुख्यमंत्र्यांची कडोंमपा आयुक्तांना फटकार

कल्याणच्या डंपिंग ग्राउंड कचराप्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

(बालकृष्ण मोरे)

कल्याण / कल्याणमधील आधारवाडी डंपिंग ग्राऊंडची कचरा सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. सदरचे डंपिंग ग्राऊंड बंद करावे असे आदेशही मुंबई उच्चन्यायालयाने २ वर्षापूर्वी दिले आहेत. प्रत्येक अधिवेशनात मी कचरा प्रश्नावर आवाज उठवला आहे.

सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही कल्याण डोंबिवली महानगरपालिका कचरा प्रश्न सोडविण्यात पूर्णतः अपयशी ठरली आहे. कडोंमपाने नियुक्त केलेली कंपनी प्रगतीपथावर काम करत नाही. सामाजिक संस्था आणि लोकसहभाग मिळत असताना त्यांनाही सामावून घेतले जात नाही. गतिशील काम करून दिवसाला ८०० मेट्रिक टन कचऱ्याचे विघटन करू शकेल अशा प्रस्तावित कंपनीला महानगरपालिकेने प्रायोगिक तत्वावर ५ एकर जागा उपलब्ध करून दिली तर कचऱ्यावर मार्ग निघेल.

कडोंमपा अनधिकृतपणे छोटे छोटे कचरा प्रकल्प उभे करत आहे. हे प्रकल्प उभे करत असताना सर्व नियमांना डावलले जात आहे. लोकांचा विरोध असतानाही शहरी लोकवस्ती असलेल्या बारावे येथील गोदरेज हिल आणि जैन सोसायटी परिसरात होत असलेले दोन्ही कचरा प्रकल्प तातडीने रद्द करावेत आणि उंबर्डे कचरा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

या बाबत बोलताना आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले डंपिंग ग्राउंड उंबर्डे येथे शिफ्ट केले जाणार नसून कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.तेथे कचऱ्या पासून खत, बायो गँस आदी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत असे त्यांनी या वर होत असलेल्या विरोधा बाबत बोलताना सांगितले.


कल्याण / कल्याणमधील आधारवाडी डंपिंग ग्राऊंडची कचरा सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. सदरचे डंपिंग ग्राऊंड बंद करावे असे आदेशही मुंबई उच्चन्यायालयाने २ वर्षापूर्वी दिले आहेत. प्रत्येक अधिवेशनात मी कचरा प्रश्नावर आवाज उठवला आहे. सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही कल्याण डोंबिवली महानगरपालिका कचरा प्रश्न सोडविण्यात पूर्णतः अपयशी ठरली आहे.

कडोंमपाने नियुक्त केलेली कंपनी प्रगतीपथावर काम करत नाही. सामाजिक संस्था आणि लोकसहभाग मिळत असताना त्यांनाही सामावून घेतले जात नाही. गतिशील काम करून दिवसाला ८०० मेट्रिक टन कचऱ्याचे विघटन करू शकेल अशा प्रस्तावित कंपनीला महानगरपालिकेने प्रायोगिक तत्वावर ५ एकर जागा उपलब्ध करून दिली तर कचऱ्यावर मार्ग निघेल.

कडोंमपा अनधिकृतपणे छोटे छोटे कचरा प्रकल्प उभे करत आहे. हे प्रकल्प उभे करत असताना सर्व नियमांना डावलले जात आहे. लोकांचा विरोध असतानाही शहरी लोकवस्ती असलेल्या बारावे येथील गोदरेज हिल आणि जैन सोसायटी परिसरात होत असलेले दोन्ही कचरा प्रकल्प तातडीने रद्द करावेत आणि उंबर्डे कचरा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

या बाबत बोलताना आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले डंपिंग ग्राउंड उंबर्डे येथे शिफ्ट केले जाणार नसून कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.तेथे कचऱ्या पासून खत, बायो गँस आदी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत असे त्यांनी या वर होत असलेल्या विरोधा बाबत बोलताना सांगितले.

कल्याण पश्चिममध्ये असलेल्या कचरा प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात आमदार नरेंद्र पवार यांनी आवाज उठवल्यानंतर तत्काळ त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्रि अतिथीगृहात बैठक आयोजित केली होती. कल्याणमध्ये नवीन होऊ घातलेले छोटे छोटे कचरा प्रकल्प रद्द करणे व जुन्या डंपिंग ग्राऊंडची मुदत संपल्यानंतरही त्यावर कार्यवाही होत नसल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आधारवाडी डंपिंग ग्राऊंड पूर्णतः बंद झाले पाहिजे आणि कल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपला पाहिजे अशीच भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे. आधारवाडी डंपिंग ग्राऊंडमध्ये तातडीने लक्ष घालून कार्यवाही करा. सामाजिक संस्था आणि लोकसहभाग मिळत असेल त्यांना सामावून घ्या. प्रायोगिक तत्वावर ५ एकर जागा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना दिले. त्यासोबतच उंबर्डे येथील ३५० मेट्रिक टन कचरा विघटन करण्याची क्षमता असलेला प्रकल्प आणि २ बायोगॅस प्रकल्प १५ सप्टेंबर २०१९ पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले. बारावे येथील एसएलएफ प्रकल्पालाबाबत देवधर समितीच्या माहितीनुसार सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मात्र कडोंमपाने जर कचरा प्रश्नावर ठोस काम करत गतीशीलता दाखवली नाही तर परिणामी आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबविण्याची तंबीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली.

आंदोलना दरम्यान दाखल केलेले गुन्हे घेणार मागे

कचरा प्रश्न उग्र असताना अनेक सामाजिक संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी लोकशाहीने आंदोलन केले होते. दरम्यानचे स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची आमदार नरेंद्र पवार यांच्या विनंतीचा विचार करत गुन्हे मागे घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगितले. मात्र कोणीही कायदा हातात घेऊ नये असेही त्यांनी बैठकीत संगितले.

यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास प्रधानसचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे ई. रवींद्रन, कडोंमपा आयुक्त गोविंद बोडके, उपभियंता नवांगूळ, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, संजिता नायर, वंदना सोनवणे, मीनाक्षी डोईफोडे,  ऍड. निशा करमरकर  आदी लोक या वेळी उपस्थित होते.

उच्चभ्रू वसाहतीतील बारावे गोदरेज हिल व जैन सोसायटी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्यात येणार आहेत. मग आगरी वस्तीतील गावकऱ्यांच्या माथी कचरा डम्पिंग का ? असा प्रश्न स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर तसेच नगरसेवक मोहन  उगले यांनी उपस्थित केला आहे

आमचा या प्रकल्पास विरोध असल्याचे नगरसेवक जयवंत भोईर यांनी सांगितले.कचरा गाड्या जाण्या साठी येथे रस्ते आहेत का असा प्रश्न ही उपस्थित करत नगरसेवक भोईर यांनी सांगितले की रस्ते बनविले जात नाहीत मात्र डम्पिंग उबर्डे गावच्या राहिवाश्याच्या माथी मारले जात आहे. तर नगरसेवक मोहन उगले यांनी निवडणुका आल्यावर जैन सोसायटी व बारावे गोदरेज हिल परिसरातील उच्चभ्रू कडे लक्ष जात आहे पण आगरी समाजा कडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवक उगले यांनी या प्रश्नावर केला.


Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email