कल्याण ; लहान मुलांचे भांडण सोडवणाऱ्या तरुणासह त्याच्या कुटुंबाला मारहाण
कल्याण दि.१८ – लहान मुलांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवणे एका तरुणाला भलतेच महागात पडले. या तरुणासह त्याच्या आई वडील भावासह मित्राला शिवीगाळ करत त्याला व त्याच्या वडिलाना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण शहाड येथे घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी नेहल कोनकर ,नितीन कोट ,केतन कोट,यांच्यासह शहाड गावातील २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :- रविवारी सकाळपासून फेसबूकची सेवा ठप्प
कल्याण शहाड मोहने रोड येथील गृरुदर्शन तोवर मध्ये राहणारे किरण जाधव शुक्रवारी रात्री सोसायटी च्या आवारात असता त्यांना लहान मुले व शहाड गावातील लहान मुलांमध्ये भांडण सुरु असल्याचे दिसले किरण यांनी हे भांडण सोडवण्यासाठी पुढे जावून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांमुळे संतापलेल्या शहाड गावातील २ते २५ जणांनी थेट सोसायटी गाठत किरण व त्यांच्या वडिलांसह त्याचा इतर मयूर भोसले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच किरण यांची आई शिवीगाळ केली. या प्रकरणी किरण याने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी नेहल कोनकर ,नितीन कोट ,केतन कोट,यांच्यासह शहाड गावातील २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.