कल्याण ; क्षुल्लक वादातून मारहाण
कल्याण – कल्याण पश्चिम बेतूरकर पाडा येथे पंचरत्न सोसायटी मध्ये राहणारे गणेश पानखडे हे रात्री दीड वाजण्याच्या सुमारस राम बाग परीसरातील बँकेसमोरून जात असतांना त्यांचा मित्र शुभम दाभीळकर व रुपेश पाटील यांना त्याला हटकले या दोघांनी तुझ्या मुळेच आमचे भांडणं झाले असे सांगत गणेश यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गणेश यांना गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी शुभम दाभीळकर व रुपेश पाटील विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- कल्याण ; लहान मुलांचे भांडण सोडवणाऱ्या तरुणासह त्याच्या कुटुंबाला मारहाण