कल्याण-डोंबिवलीकरांचे साडेसहा हजार कोटी केव्हा देणार?

मुंबई दि.१९ – गेले चार वर्ष जुमलेबाजी व अतिरंजित आकडे दर्शवून खोट्या विकासाच्या वल्गना करणे यापेक्षा अधिक मोदी तसेच राज्यातील फडणवीस सरकारने काहीही केलेले नाही. कल्याण येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमात जुमलेबाजी करणार्‍या पंतप्रधानांनी मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवली महापालिकेला साडेसहा हजार कोटी कधी देणार हे जाहीर करावे, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी लगावला. सिडको महागृहनिर्माण योजना २०१८ अंतर्गत जवळपास ८९,७७१ हजार घरे बांधण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते आज कल्याण येथे करण्यात आले. सदर प्रकल्पान्वये नवी मुंबई येथील विविध रेल्वेस्थानकांच्या जवळ घरे बांधण्यात येणार आहेत.

हेही वाचा :- डोंबिवली पूर्वचा पाणी पुरवठा मंगळवार ऐवजी शुक्रवारी बंद

नवी मुंबईत बांधण्यात येणार्‍या घरांचे भूमिपूजन कल्याण येथे कसे करण्यात येते याचे उत्तर पंतप्रधानांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या निविदाही काढण्यात आलेल्या नाहीत. हा प्रकल्प इतर प्रस्तावित प्रकल्पांकरीता राखीव जागांवर करण्यात येणार असल्याने जमिनीच्या वापरातही बदल अभिप्रेत आहे. त्यामुळे निवडणुकांपर्यंत प्रक्रिया पार पडणे शक्य नाही. म्हणूनच भूमीपूजनाचे नाटक करून जनतेला फसविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.ठाणे ते भिवंडी अशा मेट्रो प्रकल्पाकरीता जमिनीचे एक इंचही अधिग्रहण झाले नाही. पर्यावरण व वन विभागाची परवानगीदेखील मिळलेली नाही. या मेट्रोचा मार्गही ठरलेला नाही. असे असतानाही निवडणुका समोर ठेऊन भूमिपूजन करण्याचा सरकारचा प्रयत्न हास्यास्पद आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email