कल्याण- डोंबिवलीत घरफोडीचे सत्र सुरूच
डोंबिवली दि.२६ – कल्याण डोंबिवली मध्ये चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून घरफोडीचे सत्र सुरु केले आहे शुक्रवार शनिवारी या दोन दिवसात विविध पोलीस स्थानकात तब्बल पाच घरफोड्यांची नोंद करण्यात आली असून लाखोचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. कल्याण पूर्वेकडील कोल्शेवाडी खडेगोळवली येथील प्रयाग कॉलनी मध्ये राहणारे नेल्सन पगारे यांच्या पत्नीला ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने ते शुक्रवारी सायंकाळी घराला कुलूप लावून रुग्णालयात गेले होते. हि संधी साधता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरच कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने ,डीव्हीडी व इस्त्री असा एकूण ५२ हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.
हेही वाचा :- कल्याण ; उघड्या दरवाजावाटे सोन्याचा हार लांबवला
शनिवारी सकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. तर दुसरी घटना कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरात घडली नांदिवली येथील जय हनुमान कान्स्त्रक्ष्ण मध्ये चाळीत राहणारे मनोहर साहू याचे घर आणि बाहेरच्या बाजूस तिसाई बुक डेपो नावेने दुकान आहे गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते घरी झोपले असताना अज्ञात चोरट्याचे त्यांच्या दुकानाचे शटर तोडून दुकानात घुसून दुकानातील ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली तर तिसरी घटना याचा दुकानालगत असलेल्या दुकानात घडली याच दुकानाच्या बाजूला असलेल्या ज्योतिर्लिंग फुटवेयर या दुकानाताचे शटर उचकतून दुकानातील २० हजारांची रोकड लंपास केली. या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवली ; कारमधून पिस्तुल चोरली
चौथी घटना कल्याण पूर्व मलंग रोड श्रीकृपा होम्स मध्ये घडली या इमरती मध्ये राहणारे रमेश अरुणालचम याच्या पत्नी शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलांना ट्युशन ला सोडण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. घराला कुलूप असल्याची संधी साधत अद्नाय्त चोरट्याने त्याच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने ,हेयर ड्रेसर व चार हजार रोकड असा मिळून एकूण ४१ हजरांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. पाचवी घटना डोंबिवली पूर्व एम आय डी सी परिसरात घडली. डोंबिवली एम आय डी सी परिसारत डेक्कन कलर एंड केमिकल्स प्रा ली या कंपनीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करत टाकीतील कलर केमिकल्स खाली सोडून दीड लाखांच्या केमिकल चे नुकसान केले तसेच दोन स्टील च्या प्लेट चोरून नेल्या या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केला असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.