कल्याण डोंबिवलीत वाहन चोरट्यांचा धुमाकूळ
(श्रीराम कांदु)
कल्याण दि.०१ – कल्याण डोंबिवलीत वाहन चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून सोमवारी दिवस भरात कल्याण डोंबिवली मधील विविध पोलीस स्थानकात एक चारचाकी सह दोन मोटर सायकल चोरीची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या गुन्ह्यामुळे वाह्नमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कल्याण नजीक असलेल्या खडवली येथे राहणारे अनिरुद्ध जाधव आपली चार चाकी स्विफ्ट डिझायर गाडी रविवारी रार्त्री कल्याण पश्चिम वायले नगर येथील गोकुळ नगरी सोसायटी समोरील रस्त्यावर पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने हि चारचाकी रविवारी रात्री चोरून नेली सोमवारी सकाळी गाडी चोरीस गेल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
सदर घटना सीसीटीव्ही कमेरात कैद झाली असून या फुटेज च्या आधारे पोलीसांनी चोरत्याचा शोध सुरु केला आहे. तर दुसरी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. कल्यान पूर्व चक्की नाका सोनावणे चाळ सुदामा निवास रचना पार्क येथे राहणारे छगन शिंदे यांनी सोमवारी रात्री आपली दुचाकी घराखाली पार्क केली व ते घरी निघून गेले. अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास त्यांची दुचाकी चोरून नेली सकाळी गाडी चोरी झाल्याची लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्ररी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला.
तिसरी घटना कल्याण पश्चिम इंद्रप्रस्थ सोसायटी नजीक गौरी गणेश अपार्ट मेंट मध्ये राहणारे विजय नायडू यांनी आपली बुलेट शनिवारी घराखाली पार्क करून ते घरी निघून गेले रविवारी सकाळी पुन्हा गाडी काढण्यास आले असता त्यांन गाडी आढळली नाही त्यांनी गाडीचा शोध घेतला मात्र गाडी आढळून न आल्याने त्यांनी अखेर या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.